

Qualification Marketing
sakal
कोल्हापूर : महापालिकेची निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांकडून आपल्या शैक्षणिक पात्रतेचे मोठ्या प्रमाणात ‘मार्केटिंग’ सुरू आहे. इच्छुक म्हणून ज्यांचे ज्यांचे फलक गेल्या पंधरा दिवसांपासून झळकत आहेत, त्यावर त्यांची शैक्षणिक गुणवत्ता ठळक अक्षरात लिहिली जात आहे. यावरून महापालिकेच्या नव्या सभागृहात उच्चशिक्षित नगरसेवक जास्त येण्याची शक्यता आहे.