
कसबा बावडा : घरगुती वादातून साठ वर्षीय वृद्धा कसबा बावडा राजाराम बंधाऱ्यावर दाखल झाली. पुराचे पाणी पाहण्यासाठी काही प्रमाणात गर्दी होती. या वृद्धेने अचानक पुराच्या पाण्यात उडी घेतली. ही घटना पाहणाऱ्या तरुणांनीही पाण्यात उतरत महिलेला काठावर आणले. याची माहिती मिळताच पोलिसांच्या ‘डायल ११२’ वाहनावरील महिला अंमलदार शीतल गुरव, उत्तम पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेची समजूत घालून वाहनातून पोलिस ठाण्यात आणले.