
- अभिजित कुलकर्णी
नागाव : वीज वितरणच्या कारभाराचा जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाला मोठा फटका बसत आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून उद्योजक स्वतः वीजनिर्मितीमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करत आहेत. असे असताना पीक अवरच्या नावाखाली उद्योजकांचे बिल पूर्णतः माफ होणार नाही, याची काळजी महावितरण घेत आहे. शिवाय महावितरणच्या पारंपरिक विद्युत वाहिन्यातून होणाऱ्या वीज गळतीचा अधिभार वीज ग्राहकांवर लादून महावितरण औद्योगिक ग्राहकांचे शोषण करत आहे.