
Shivram Bhoje Death
esakal
Shivram Bhoje Biography : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व कोल्हापूरचे सुपुत्र पद्मश्री डॉ. शिवराम बाबूराव भोजे (वय ८३, रेवंता अपार्टमेंट, राजाराम रायफल्स परिसर) यांचे आज निधन झाले. ते दहा दिवसांपासून फुफ्फुसात जंतूंचा संसर्ग झाल्याने आजारी होते. त्यांना राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारातून बरे झाल्यानंतर त्यांना चार दिवसांपूर्वी घरी आणण्यात आले होते. आज दुपारी साडेचार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी उमा, मुली वर्षा, विद्या व वीणा असा परिवार आहे. उद्या (ता. १७) सकाळी दहा वाजता कसबा सांगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.