

Emmanuel Macron on Leena Nair
esakal
Kolhapur Leena Nair global recognition : अल्फाबेट, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, ॲडोब, पावलो अल्टो नेटवर्कस् यांसारख्या जागतिक कंपन्यांमध्ये भारतीय-वंशाचे सीईओ आहेत आणि आता चॅनेलच्या सीईओसुद्धा कोल्हापूर (महाराष्ट्र) मधील आहेत. भारत केवळ जागतिक नवोन्मेषात सहभागी होत नाही, तर अशा ठिकाणी नेतृत्व करतो, असे गौरवोद्गार फ्रेंचचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काढत कोल्हापूरच्या कन्येचा आवर्जून उल्लेख केला. त्यांनी लीना नायर यांचा उल्लेख केला ते जागतिक नेतृत्वाचे उदाहरण म्हणून त्या उल्लेखाने कोल्हापूरच्या कन्येने जागतिक पातळीवर कर्तृत्वाचा ठसा कसा उमटवला आहे, याचा दाखला मुंबईत झालेल्या इंडिया-फ्रान्स इनोव्हेशन फोरममध्ये मॅक्रॉन यांनी दिला. कोल्हापूरच्या मातीत घडलेल्या कन्येच्या प्रेरणादायी वाटचालीवर प्रकाश पडला. लंडनस्थित फ्रेंच लक्झरी हाऊस चॅनेलच्या त्या जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत.