
Kolhapur Tragedy News : भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. गुडाळ (ता. राधानगरी) येथून सकाळी अकरा वाजता त्यांची बहीण शालाबाई कोथळकर या भावाला राखी बांधून त्याला दीर्घायुष्य लाभावे यासाठी शिरगाव येथे आल्या. बहिणीने भावाला राखी बांधली, औक्षणही केले. त्यांच्या गप्पाही रंगल्या. गप्पा मारून झाल्यावर भाऊ वैरण आणण्यासाठी घरातून गेला आणि चक्कर येऊन पडला.