
कोल्हापूर : वीज बचत करणे म्हणजेच त्याची निर्मिती करणे, हे धोरण डोळ्यांसमोर ठेवूनच जिल्ह्यातील राधानगरीत आगळावेगळा प्रकल्प राबवला जात आहे. यात गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणांसह सरकारी कार्यालयांतील वीजपुरवठ्याची जुनी यंत्रणा बदलण्यात येणार आहे. कोल्हापूर विभागातील पहिला प्रकल्प इतर गावांसाठी पथदर्शी ठरेल.
महाऊर्जाचे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे कार्यालय कोल्हापूर येथे आहे. या विभागाकडून अपारंपरिक ऊर्जेच्या अनेक योजना या विभागाकडील निधीतून तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून केल्या जातात. अपारंपरिक ऊर्जेचे महत्त्व वाढावे, त्याचा वापर वाढावा म्हणून मेडाने ऊर्जा बचत करणाऱ्या गावांचा उपक्रम हाती घेतला आहे. यात कोल्हापूर विभागातील राधानगरीचा समावेश आहे.
जुने उपकरणे बदलून
30 टक्के विजेची बचत
या योजनेंतर्गत गावातील जुन्या इमारती, शासकीय कार्यालय, मंदिरे आदी ठिकाणांना वर्षोनवर्षे जो वीजपुरवठा करण्यात येतो, त्या विजेचे वायरिंग बदलले जाणार आहे. तसेच वीज वापरणारी उपकरणे जसे जुने फॅन, बल्ब आदीही बदलले जाणार आहेत. यातून 30 टक्केची बचत होणार आहे.
पाणी योजना सोलरवर;
90टक्के विजेचा खर्च वाचणार
राधानगरीच्या पाणी योजनेचे वीज बिल हे लाखो रुपयांचे आहे. त्यामुळे पाणी योजनाच सोलारवर सुरू होणार आहे. यासाठी 50 किलो वॉट ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत गावाला पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाणी योजनेच्या विद्युत व्यवस्थेसाठी होणार 90 टक्केंचा खर्च वाचणार आहे.
राधानगरी हे वीज बचत करणारे गाव ठरणार आहे. इतर गावांनीही बोध घेऊन अपारंपरिक ऊर्जा स्तोत्रांचा वापर करणे आवश्यक आहे. गावातील पाणी योजना, स्ट्रीट लाईट व सरकारी कार्यालयाच्या वीजपुरवठ्यावर होणारा खर्च थांबला तर हा निधी गावांच्या इतर विकासकामांना उपयुक्त ठरणार आहे.
- संभाजी शिंदे, प्रकल्प अधिकारी, मेडा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.