esakal | कोल्हापुरातील उद्योजकांचे विधायक पाऊल ः प्रशासनला दिली अत्याधुनिक व्हेंटिलेटर
sakal

बोलून बातमी शोधा

 Entrepreneurial step of Kolhapur entrepreneurs: State-of-the-art ventilator given to the administration

कोल्हापूर  जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि अपुरी वैद्यकीय साधने यामुळे प्रशासनाची कसरत होत आहे. यात पालकमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार उद्योजकांनी संयुक्त प्रयत्न करण्याचा निर्णय झाला. स्मॅकच्या माध्यमातून सुमारे 49 लाखांचे सात व्हेंटिलेटर आज प्रशासनाला दिले.

कोल्हापुरातील उद्योजकांचे विधायक पाऊल ः प्रशासनला दिली अत्याधुनिक व्हेंटिलेटर

sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

नागाव ः कोविड-19च्या उपचारासाठी जिल्ह्यात व्हेंटिलेटरची कमतरता होती. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आवाहनानुसार शिरोली मॅन्युफॅक्‍चर्स असोसिएशनतर्फे (स्मॅक) आज जिल्हाधिकारी यांच्याकडे व्हेंटिलेटर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले.

कोल्हापूर  जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि अपुरी वैद्यकीय साधने यामुळे प्रशासनाची कसरत होत आहे. यात पालकमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार उद्योजकांनी संयुक्त प्रयत्न करण्याचा निर्णय झाला. स्मॅकच्या माध्यमातून सुमारे 49 लाखांचे सात व्हेंटिलेटर आज प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या उपस्थिती व्हेंटिलेटर प्रदान कार्यक्रम झाला. यावेळी झंवर उद्योग समूहाचे रामप्रताप झंवर, नरेंद्रजी झंवर, निरज झंवर, सरोज ग्रुप ऑफ कंपनीसचे दीपक जाधव व भरत जाधव, मयूरा स्टिल्सचे चंद्रशेखर डोली व रवी डोली, कॅस्प्रो ग्रुपचे प्रकाश राठोड व महेंद्र राठोड, ट्रियो इंटरप्राईजेस (सप्रे ग्रुप) चे अजय सप्रे, सप्रे ऑटो अन्सिलरीस (सप्रे ग्रुप) चे शिरीष सप्रे, शिरगावकर ग्रुपचे सचिन व सोहम शिरगावकर, घाटगे पाटील इंडस्ट्रीजचे किरण पाटील व उद्यम को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून प्रशासनाकडे 49 लाख रुपये किमतीचे व्हेंटिलेटर दिले. या वेळी पालकमंत्री पाटील, आमदार जाधव, आमदार पाटील व आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी स्मॅकचे व उद्योजकांचे आभार मानले. 

- संपादन - यशवंत केसरकर

loading image
go to top