

Shivaji University degree certificate correction process
esakal
Kolhapur University Administration Lapses : शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात वितरण केलेल्या पदवी प्रमाणपत्रात कुणाचे छायाचित्र वेगळे, तर कुणाच्या नावात बदल अशा चुका झाल्या आहेत. त्याबाबत विद्यार्थ्यांनी परीक्षा मंडळाकडे तक्रार केली. या चुका दुरुस्त करून नवीन प्रमाणपत्र देण्यासाठी परीक्षा मंडळाने संबधित विद्यार्थ्यांना सोमवारी (ता. २९) विद्यापीठात बोलावले आहे. यातील काही विद्यार्थ्यांना नोकरीच्या ठिकाणी ही प्रमाणपत्रे सादर करावयाची होती. त्यामुळे त्यांनी या चुकांबद्दल संताप व्यक्त केला.