अशोक सराफ यांच्या पुरस्कारावेळी राजकीयटोलेबाजी पहायला मिळाली
esakal
Kolhapur Ashok Saraf : कार्यक्रम अशोक सराफ यांच्या पुरस्काराचा, चर्चा मुश्रीफ, बंटी पाटील, उदय सामंत यांच्या राजकीय टोलेबाजीची, मामाही म्हणाले...
तीन हायलाइट पॉइंट्स :
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या सत्कार सोहळ्यात मंत्र्यांची राजकीय टोलेबाजी प्रेक्षकांचे मनोरंजन ठरली.
मंत्री हसन मुश्रीफ, उदय सामंत आणि आमदार सतेज पाटील यांनी एकमेकांना हलक्या फुलक्या शैलीत टोमणे मारले; कार्यक्रमात हास्याचा खळखळाट झाला.
अशोक सराफ यांनीही या विनोदी वातावरणावर भाष्य करत “आम्ही कसले कॉमेडियन, यांच्यापेक्षा जबरदस्त विनोद यांना सुचतात” असे म्हणत मंत्र्यांचे कौतुक केले.
Ashok Saraf In Kolhapur : ज्येष्ठ अभिनेते, पद्मश्री अशोक सराफ यांना पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सतेज पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्यात रंगलेल्या राजकीय टोलेबाजीने हास्याचा चांगलाच खळखळाट निर्माण केला.