
Sangli Political Updates : माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी नगराध्यक्ष सांगली जिल्हा बॅंकेचे संचालक चिमण डांगे व इस्लामपूरचे माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे बुधवारी (ता. ३०) मुंबई येथे भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करतील. पुढच्या महिन्यात वाळवा तालुक्यात मोठा कार्यक्रम घेऊन ते भाजपमध्ये सक्रिय होतील.