Ichalkaranji Former Army kill : पत्नी, दोन मुलांनी मिळून केला माजी सैनिकाचा खून, कबनूरमध्ये घटना

wife killed ex-serviceman : इचलकरंजीजवळील कबनूर येथे पत्नी आणि दोन मुलांनी मिळून माजी सैनिकाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
wife killed ex-serviceman kabnur ichalkaranji

wife killed ex-serviceman kabnur ichalkaranji

esakal

Updated on

Kolhapur crime update : इचलकरंजी शहरालगतच्या कबनूर एका माजी सैनिकाचा पत्नी आणि दोन मुलांनी मिळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. धारदार शस्त्राने पाठीत खोलवर वार झाल्याने बाळू बापू बामणे (वय ५८, रा. शिवाजी कॉर्नर, कबनूर) यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला पत्नी आणि मुलाकडून हा मृत्यू काचेच्या टेबलावर पडल्याने झाल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र, शिवाजीनगर पोलिसांच्या सतर्क तपासामुळे खून उघडकीस आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com