esakal | अंबाबाई मंदिराच्या आवारात उत्खननात सापडल्या सव्वाशेहून अधिक तांब्याची नाणी, देवतांच्या मूर्ती अन्‌ बंदूकही
sakal

बोलून बातमी शोधा

Excavation of Manakarnika Kunda in the courtyard of Ambabai temple found in Idols of gods kolhapur historical marathi news

लवकरच भाविकांना पाहण्यासाठीही त्या खुल्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती आज देवस्थान समितीने दिली. 

अंबाबाई मंदिराच्या आवारात उत्खननात सापडल्या सव्वाशेहून अधिक तांब्याची नाणी, देवतांच्या मूर्ती अन्‌ बंदूकही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरीव नक्षीकाम असलेल्या दगडांबरोबरच काचेचे कंदील, जर्मन बनावटीची बंदूक, शिवलिंग, घड्याळ, तांब्याची नाणी, विविध देव-देवतांच्या धातूच्या मूर्ती, विरगळांसह विविध धातूंची भांडी मणकर्णिका कुंडाच्या उत्खननात सापडली आहेत. सर्व वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवल्या असून, आणखी उत्खननात ज्या वस्तू मिळतील, त्याही याच ठिकाणी ठेवल्या जाणार आहेत. लवकरच भाविकांना पाहण्यासाठीही त्या खुल्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती आज देवस्थान समितीने दिली. 

अंबाबाई मंदिराच्या आवारातील मणकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. सुमारे 26 फुटांपर्यंत खोदाई झाली असून, आणखी 13 फूट खालीपर्यंत खोदाई करावी लागणार आहे. खोदाईनंतर कुंडाचे मूळ स्वरूप उलगडत असून, उत्खननात सापडलेल्या सर्व वस्तू व साहित्याच्या नोंदी करून त्या सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत.

हेही वाचा- अर्थसंकल्पात घोषणा; कोल्हापूर पॅटर्न आता राज्यभर

हा कुंड 60 बाय 60 फूट इतका असून, कुंडात उतरण्यासाठी दक्षिण व उत्तर बाजूने पायऱ्या आहेत. पन्नासहून अधिक विरगळ आणि पाच ओवऱ्या आत्तापर्यंत आढळून आल्या आहेत. माती व विविध धातूंच्या पंचवीसहून अधिक मूर्ती मिळाल्या आहेत. त्याशिवाय सव्वाशेहून अधिक तांब्याची नाणी मिळाली आहेत. उत्खननात काढलेली मातीही जतन केली जाणार आहे.  

संपादन-अर्चना बनगे