कोल्हापूर : जिल्ह्यातून एक वर्षे हद्दपार असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला करवीर पोलिसांनी सडोली दुमाला येथे रात्री अटक केली. त्यांनी चोरलेली रिक्षाही पोलिसांनी जप्त केली..पोलिसांनी सांगितले की, राजा ऊर्फ रविराज महेश कसबेकर (वय २७, रा. टेंबलाईनाका, दोन नंबर गेट झोपडपट्टी, कोल्हापूर) आणि त्याचा साथीदार रोहित दिनकर पाटील (वय ३६, रा. ८१४/५, ई वॉर्ड, जमादार कॉलनी, कदमवाडी, कोल्हापूर. सध्या रा. चांदणी नगर, रुईकर कॉलनी, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राजा हा एक वर्षासाठी हद्दपार आहे..Kolhapur Crime News: यल्लम्मा चौकात थरार! पिस्तूल घेऊन फिरणारे दोघे गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात; तात्काळ कारवाईत विदेशी बनावटीचे पिस्तूल जप्त.करवीर पोलिसांकडून रात्री सडोली दुमाला येथे गस्त सुरू होती. पहाटे चारच्या सुमारास या परिसरात दोन संशयित रिक्षातून फिरत असताना दिसले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांची नावे राजा ऊर्फ रविराज आणि रोहित अशी असल्याची माहिती मिळाली. .पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर राजाला करवीर प्रांताधिकारी यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केल्याची माहिती पुढे आली. त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे सापडलेल्या रिक्षाची माहिती घेताना ती राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेल्याची माहिती पुढे आली. .Pune Crime : पुण्यात चोरट्यांची 'जनावरे' आणि 'लॅपटॉप'वर नजर! एकाच रात्री ८० हजारांची चोरी; खडकी आणि हडपसरमध्ये घटना.पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेली रिक्षाही जप्त केली. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. राजाचा साथीदार रोहित पाटील याच्यावर मात्र आजपर्यंत एकही गुन्हा दाखल नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. मूळ रिक्षा चालकाचा शोध सुरू आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.