

पुढील आठ दिवस कडाक्याच्या थंडीचा कहर कायम राहणार, असे वेधशाळेचे अंदाज. तापमान आणखी घसरू शकते, थंडीची लाट कायम राहणार.
esakal
Extreme Coldwave : काहीशी उशिरा आलेली थंडी गेल्या आठवड्यापासून शहर आणि परिसरात स्थिरावली आहे. आज तापमानात वाढ झाली असली तरी मध्यरात्रीनंतर पारा १५ अंशांखाली आला. दिवसभर गारठा आणि मध्यरात्रीनंतर हुडहुडी भरेल अशी थंडी, असे वातावरण दिवसभर होते. थंडीचा कडाका आठ ते पंधरा दिवसांपासून वाढला आहे. आज पहाटे धुके पडले होते. सकाळी सात वाजेपर्यंत थंडीची तीव्रता अधिक असून, तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत होते. ९ वाजल्यानंतर ऊन पडले होते.