
Kolhapur Crime : एका बॅंकेच्या एटीएमद्वारे खात्यावर भरलेल्या पाचशे रुपयांच्या ३५ बनावट नोटांप्रकरणी पोलिसांनी स्थानिक व कर्नाटकातील चौघांना अटक केली असून या सर्वांची न्यायालयाने २५ जूनपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, या बनावट नोटांची तस्करी ओडिशातून होत असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस त्यादृष्टीने तपास करीत असून नोटा खपवण्यासाठी आंतरराज्य टोळीची शक्यताही पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी वर्तविली.