
कोल्हापूर : बनावट नोटा छपाई प्रकरणात करवीर पोलिसांनी मूर्ती कारागीर विकास वसंत पानारी (वय ३५, रा. शिंगणापूर, ता. करवीर) याला अटक केली. मुख्य संशयित सिद्धेश घाटगे याच्या घरातून पोलिसांना नोटा छपाईचे साहित्य मिळून आले असून दोघे मिळून छपाई करीत होते. झटपट पैसे मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले. नोटांचे डिझाईन बनवून देणारे आणखीन दोघे पोलिसांच्या रडारवर आहेत.