Fake Liquor Bottles : भेसळ इंग्लिश नजराणा! नामांकित ब्रँडची दारू विक्री, घरातच काढला कारखानाच; ऐन निवडणुकीत मोठी कारवाई

Liquor Racket Busted : नामांकित इंग्लिश दारूची भेसळ करून विक्री करणारा कारखाना थेट घरातून चालवला जात होता. ऐन निवडणुकीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
fake-english-liquor-factory-busted-election-action

fake-english-liquor-factory-busted-election-action

esakal

Updated on

Branded Liquor Adulteration Kolhapur : भेसळयुक्त बनावट दारू बनवून विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दशरथ जालिंदर कुंभार (वय २९, रा. माळवाडी, भेंडवडे, हातकणंगले, सध्या रा. निळे, ता. शाहूवाडी) याला सापळा रचून पकडले. बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथे केलेल्या कारवाईत त्याच्या ताब्यातील दुचाकीवर बनावट मद्याच्या बाटल्यांचे तीन बॉक्स आढळले, तर हातकणंगलेतील मौजे तासगावमध्ये राहणारा जयदीप रघुनाथ कांबळे (वय ३६) हा घरातच ही दारू बनवत असल्याचे समोर आले. त्याच्या घरीही छापा टाकून मद्याचे आणखी तीन बॉक्स जप्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com