
Fake Massege Supreme Court
esakal
Kolhapur Fraud News : वित्तीय कंपनीशी तडजोड खर्चाचे चार कोटी १० लाख रुपये भरल्याचा बनावट बँकेचा बनावट ‘यु.टी.आर.’ मेसेज तयार करून सर्वोच्च न्यायालयात त्याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा प्रकार उघड झाला. सर्वोच्च न्यायालय आणि संबंधित वित्तीय कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी अब्दुललाट येथील चैतन्य बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक दशरथ गणपती काळे व सूरज कणसे यांच्याविरोधात कुरुंदवाड पोलिस ठाण्यात आज फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. भरत इंद्रसेन जयकर (वय ५५, रा. औक्सिलो फिन्सर्व प्रा. लि., अंधेरी (पूर्व) यांनी फिर्याद दिली.