

Tantrik’s Fraud
sakal
कोल्हापूर: वेगवेगळ्या समस्यांवर एका चुटकीत उपाय करण्याचा दावा करणाऱ्या ‘चुटकीबाबा’ म्हणजेच सनी रमेश भोसले (रा. टिंबर मार्केट) याच्याविरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुप्तधन, भूतबाधा दूर करणे, लग्न जुळवून देणे अशा कारणांसाठी त्याने ४५ हजार रुपये घेतल्याची तक्रार गणेश विश्वास काटकर (रा. उत्तरेश्वर पेठ) यांनी दिली.