
Farmer Dies Kolhapur : भालेकरवाडी (ता. भुदरगड) येथे शेतात नांगरट करत असताना रोटावेटरखाली सापडून शेतकरी जागीच ठार झाला. मारुती नारायण भालेकर (वय ४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तर पत्नी शोभा मारुती भालेकर (४०) या रोटावेटर उचलण्याच्या प्रयत्नात रोटावेटरमध्ये दोन्ही पाय सापडल्याने गंभीर जखमी झाल्या.