
कुंडलिक पाटील
कुडित्रे : कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅक (फार्मर आयडी) अनिवार्य केली आहे. एकीकडे एक लाख शेतकऱ्यांची फार्मर आयडी प्रलंबित आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचे वारस नाव लागले असताना व नवीन खातेदार शेतकऱ्यांची नावे ऑनलाईनला दिसून येत नाहीत. यामध्ये शेतकऱ्यांचा लाईव्ह अपडेट डाटा अपलोड नसल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकऱ्यांना तलाठी, तहसीलदार कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे.