

Scene from Chandepaki Pal Khurd where a farmer lost his life in a fatal gaur attack
sakal
धामोड : चांदे पैकी पाल खुर्द (ता. राधानगरी) येथे काजूच्या बागेची राखण करण्यासाठी राहीचे वावर नावाच्या शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर गव्याने हल्ला केला. गव्याचे शिंग त्यांच्या छातीत घुसले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. शामराव कोंडिबा कोराणे (वय ७०, रा. पाल खुर्द) असे त्यांचे नाव आहे. ही घटना आज दुपारी दोन वाजता घडली.