
Protest on Pune-Bangalore Highway : नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात उद्या (ता. १) सकाळी पुणे-बंगळूरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीतर्फे पुलाची शिरोली येथील पंचगंगा नदी पुलावर आंदोलन होईल. यामध्ये कोल्हापूर, सांगलीसह शक्तिपीठ महामार्गात प्रस्तावित असणाऱ्या १२ जिल्ह्यांतील लोकांचा समावेश असणार आहे. आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आहे.