कोल्हापूर : महायुती सरकारचा हेतू चांगला नाही. हे सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी सक्रिय झाले आहे. त्यामुळे, राज्यातील शेतकऱ्यांना (Farmers) गोळ्या घातल्या, तरीही आम्ही शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा इशारा शक्तिपीठ महामार्गात (Shaktipeeth Highway) शेती जाणाऱ्या शेतकऱ्यांनी दिला. आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.