जयसिंगपूर : वांग्याला गेल्या दहा वर्षांतील नीचांकी दर मिळत असल्याने शेतकरी (Farmer) हतबल झाला आहे. शेतकऱ्यांकडून प्रतिकिलो अडीच रुपये किलो दराने वांग्याची खरेदी करून ग्राहकांच्या माथी मात्र २० ते २५ रुपये दराने मारली जात असल्याने शेतकरी आणि ग्राहक कंगाल फक्त दलालच मालामाल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. काढलेली वांगी (Brinjal Price) थेट बांधावर आणि ओढ्यात फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.