esakal | रोहिणीचा पेरा अन् मोत्याच्या तुऱ्यासाठी शेतकऱ्यांची धांदल
sakal

बोलून बातमी शोधा

रोहिणीचा पेरा अन्  मोत्याच्या तुऱ्यासाठी  शेतकऱ्यांची धांदल

रोहिणीचा पेरा अन् मोत्याच्या तुऱ्यासाठी शेतकऱ्यांची धांदल

sakal_logo
By
पंडित कोईगडे

सिद्धनेर्ली (कोल्हापूर) : रोहिणीचा पेरा आणि मोत्याचा तुरा. अशी भात पिकाच्या (Rice crop) पेरणीच्या बाबतीत पारंपरिक म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे.काल मंगळवारी(ता.२५) रोजी रोहिणी नक्षत्र निघाले आहे. या नक्षत्रावर पेरणी केल्या जाणाऱ्या भात पिकाचे समाधानकारक पीक मिळते.म्हणूनच हा रोहिणीचा पेरा साधण्याची ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची (Farmer)एकच लगबग सुरूआहे.शेतकरी त्याच्या कुटुंबासह शिवारात दाखल झाल्यामुळे शिवारे गजबजून गेली आहेत. (Farming-started-cultivated-Rice-cropping-kolhapur-news)

दरवर्षी मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात रोहिणी नक्षत्र निघते.या नक्षत्रावर भात पिकाची पेरणी केल्यास उत्पादन समाधानकारक उत्पादन मिळते.असा जुन्या व जाणत्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे रोहिणीचा पेरा व मोत्याचा तुरा अशी पारंपारिक म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. खरीप हंगामातील भात पिकासाठी या रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी साधून घेण्याची बळीराजाची लगबग सुरू आहे.

कागल तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे भात पीक चांगल्या प्रकारे येते. त्यामुळे या भागात या भात पिकाची पेरणीची घाई सुरू आहे. सिद्धनेर्ली परिसरात कुरीच्या साह्याने भात पेरणी केली जात आहे .ही कोरे ओढण्यासाठी पूर्वी बैलांची मदत घेतली जात असे. परंतु आता बैलांची संख्या कमी झाल्यामुळे एका भागातील शेतकरी एकत्र येऊन पैरा पद्धतीने ही कामे आटोपून घेत आहेत.आता कुरींची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे कुरी आहे त्यांना चांगलीच मागणी आहे .या कुऱ्या विनामोबदला इतर शेतकऱ्यांना देतात. भात पिक पेरणीसाठीची एक कुरी ओढण्यासाठी सहा ते सात मजूर लागतात.तर भात पीक पेरण्यात निष्णात असणारा पेरक्याही लागतो. प्रत्येक गावात असे ठराविक पेरके माहीर आहेत.

हेही वाचा- शिरोळ तालुक्यात मगरीच्या दहा पिल्लांचा मृत्यू

विशेष म्हणजे हे पेरके पेरणीसाठी केलेल्या कामाचा मोबदला घेत नाहीत. ज्या ठिकाणी भात पीक पेरणी केलेल्या क्षेत्राला पाणी देण्याची सोय किआहे तिथे शेतकरी पाणी देतात व या क्षेत्रामध्ये घात आल्यानंतर तण उगवणीपुर्वीचे तणनाशकाची फवारणी सुद्धा करतात . भात पीक पेरणी साठी पारंपारिक भात जातीं ऐवजी सुधारित जाती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.