

Father dies after daughter wedding panhala news
esakal
Emotional wedding tragedy panhala : (सागर चौगुले) : एका बाजूला दिवसभर मुलीच्या लग्नाची मंगलमय धामधूम आणि दुसऱ्या बाजूला रात्री पितृछत्र हरवल्याची हृदयद्रावक घटना पन्हाळा तालुक्यातील माजगाव (माळवाडी) येथे घडली. मुलीला सासरी पाठवल्यानंतर (पाठवणी) अवघ्या काही वेळातच सखाराम शिवाजी विचारे (वय ६४) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या घटनेमुळे विवाह सोहळ्याचे रूपांतर शोकाकुल वातावरणात झाले असून, संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.