esakal | व्यवसाय चालू ठेवायचे का नाही? कोल्हापुरात फेरीवाले कृती समितीने घेतली 'ही' भूमिका  

बोलून बातमी शोधा

Feriwale Action Committee took this role kolhapur marathi news

 मंत्री आणि चेंबर ऑफ कॉमर्स बैठकीत जो निर्णय येईल तोपर्यंत आपले व्यवसाय बंद ठेवा असे आवाहन केले

व्यवसाय चालू ठेवायचे का नाही? कोल्हापुरात फेरीवाले कृती समितीने घेतली 'ही' भूमिका  
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापुरात लागू झालेल्या  नव्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियम अटींचे पालन करत महाद्वार रोड वरील सर्व फेरीवाल्यांचे व्यवसाय सुरू होते.
 मात्र अतिक्रमण निर्मूलन पथक आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उद्या (ता.7) होणाऱ्या बैठकीमध्ये मध्ये सर्व व्यवसाय चालू ठेवायचा का नाही ? हे ठरविले जाणार आहे.


 मंत्री आणि चेंबर ऑफ कॉमर्स बैठकीत जो निर्णय येईल तोपर्यंत आपले व्यवसाय बंद ठेवा असे आवाहन केले. आवाहनाला प्रतिसाद देत उद्या पर्यंत  जीवनावश्यक आणि फळ भाजी सोडून इतर फेरीवाल्यांचे व्यवसाय बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. यातून जो काही निर्णय येईल त्यावर फेरीवाले कृती समिती जी पुढील दिशा ठरवेल. त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ अशी भूमिका आम्ही घेतली आहे.चर्चेवेळी महालक्ष्मी फेरीवाले संघटनेचे अविनाश उरसाल ,राजेंद्र महाडिक , अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख पंडित पोवार आदींसह महापालिका कर्मचारी आणि फेरीवाले उपस्थित होते.

हेही वाचा- ...तरच न्यायालयात प्रवेश मिळणार?

हेही वाचा- पोलिस भरतीची वाट पाहणारी तरुणाई रोजंदारीकडे; शासनाच्या धोरणामुळे नैराश्‍येत वाढ

संपादन- अर्चना बनगे