A violent clash erupted on Rankala Tower Road as a family dispute turned into a brawl, causing tension in the area.Sakal
कोल्हापूर
Kolhapur Crime : रंकाळा टॉवरच्या मुख्य रस्त्यावर हाणामारी; किरकोळ वादातून दोन कुटुंबात वाद
भांडण करणाऱ्या नातेवाइकांनी तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले. अखेर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कोल्हापूर : घरगुती भांडणातून हाणामारी करीत रंकाळा टॉवर मुख्य रस्त्यावर आलेल्या काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले. हाणामारीमुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे जुना राजवाडा पोलिसांनी धाव घेऊन काहींना ताब्यात घेतले, तर काहींनी पळ काढला. यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

