Kolhapur Election : अंतिम मतदार यादी अखेर प्रसिद्ध; सर्व्हर संथपणामुळे निवडणूक कार्यालयात मध्यरात्रीपर्यंत काम
Final Voter List : राज्य निवडणूक आयोगाच्या सर्व्हरचा वेग कमी झाल्याने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ३२ हजार संभाव्य दुबार मतदारांबाबत काय निर्णय घेतला गेला, याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाच्या सर्व्हरचा वेग कमी झाल्याने महापालिकेची अंतिम मतदार यादी रात्री उशिरापर्यंत प्रसिद्ध करण्याचे काम सुरू होते. फोटोसहित मतदार यादी विविध विभागीय कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली.