esakal | KMT : बसचा खुळखुळा, तिजोरीत खडखडाट
sakal

बोलून बातमी शोधा

KMT : बसचा खुळखुळा, तिजोरीत खडखडाट

KMT : बसचा खुळखुळा, तिजोरीत खडखडाट

sakal_logo
By
डॅनियल काळे

कोल्हापूर : महापालिकेचा परिवहन उपक्रम अर्थात ‘केएमटी’ची आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळली आहे. ‘केएमटी’च्या अवघ्या ३७ बस सुरू असून, प्रवाशांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागते. चार वर्षांपूर्वी घेतलेल्या नव्या कोऱ्या बसचा अक्षरशः खुळखुळा झाला असून, ६३ बस बंद आहेत. अनेक बसचा इन्शुरन्सही नाही. मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

‘केएमटी’कडे १० वर्षांपूर्वी १२० बस होत्या. त्यातून यात एक लाख प्रवासी प्रवास करत होते. पण पीएमपीची आर्थिक स्थिती दिवसागणिक ढासळत गेली. पाच वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्र सरकारने १०४ बस मंजूर केल्या. १०४ पैकी ७५ बसची खरेदी महापालिकेने केली. उर्वरित २९ बस ज्या सरकारकडून देण्यात येणार होत्या.

चार वर्षांपूर्वी महापालिकेने खरेदी केलेल्या या बसेस बसेस मोडकळीस आल्या आहेत. सद्य स्थितीत केवळ ३७ बस उपलब्ध आहेत. शहरातील व शहरालगतच्या अनेक फायद्याचे मार्ग सध्या केएमटीने नाईलाजास्तव बंद केले आहेत. कोरोना काळात फटका बसला. दीड वर्ष केएमटीची अर्थचक्र पूर्णपणे थांबले होते. या काळात नादुरुस्त बसेस दुरुस्त करून घेण्याची तसदी त्यांनी घ्यायला हवी होती. पण ती घेतली नाही. आता शाळा महाविद्यालय सुरू झाली आहेत. प्रवासी संख्येत आठ ते दहा हजारांची वाढ होऊ शकते. पण, ‘केएमटी’ची यंत्रणा मात्र कोलमडून गेली आहे.

बंद पडलेल्या ६० बस दुरुस्त करायचा म्हटले तर एका बसला सुमारे दीड लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या बसेसचा इन्शुरन्स आणि रस्त्यावर धावणे इतपत देखभाल दुरुस्ती करावी लागणार आहे. सध्या अडीच लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. यातून हा खर्च करणे परवडणारे नाही. त्यामुळे सध्यातरी बसेस बंद करून यंत्रणा सुस्त आहे.

१० वर्षांपूर्वी स्थिती

 • एकूण बस- १२०

 • प्रवासी- १ लाख

 • रोजचे उत्पन्न- ९ लाख ५० हजार

लॉकडाउनपूर्वी

 • एकूण बस- ८०

 • प्रवासी- ५० हजार

 • रोजचे उत्पन्न- ८ लाख

लॉकडाउन शिथीलनंतर

 • एकूण बस- ३७

 • एकूण प्रवासी- २५ हजार

 • रोजचे उत्पन्न- २ लाख ७५ हजार

 • नादुरुस्त बस- ६३

 • एका बसला दुरुस्तीसाठी- दीड लाख खर्च

loading image
go to top