esakal | औद्योगिक वसाहतीत कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे आग
sakal

बोलून बातमी शोधा

औद्योगिक वसाहतीत कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे आग

औद्योगिक वसाहतीत कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे आग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : यड्राव (ता. शिरोळ) येथील पार्वती औद्योगिक वसाहततीतील एनआर एंटरप्राईजेस कारखान्याला शॉर्टसर्किटने आग लागली. आगीत कार्यालय जळून खाक झाले असून सुमारे बारा लाखांचे नुकसान झाले. ही घटना आज सकाळी नऊच्या सुमारास घडली. दीड तासाच्या परिश्रमानंतर दोन अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आग आटोक्‍यात आणली. घटनेची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पार्वती औद्योगिक वसाहतीत सुशील मानधना यांच्या मालकीचा एनआर एंटरप्राईजेस या नावाचा कारखाना आहे. सध्या कारखाना बंद होता. आज सकाळी साडेनऊ वाजता मुख्य कार्यालयातून धुराचे लोट येताना दिसले. याची माहिती कारखान्याच्या मालकांना दिली. जयसिंगपूर नगरपालिका व संजय घोडावत ग्रुपच्या दोन अग्निशमन दलाला पाचारण कले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने कार्यालय जळून खाक झाले.

हेही वाचा: ज्येष्ठांसाठी आता 1090 हेल्पलाईन; पोलिस दल पुरवणार 24 तास सेवा

आगीत संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, फर्निचर सिलिंग व इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटनास्थळी कामगारांनी गर्दी केली. सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्‍यात आली. कारखान्याच्या अंतर्गत विद्युत जोडणीत शॉर्टसर्किटने आग लागल्याची शक्‍यता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली. आगीच्या घटनेची नोंद शहापूर पोलिसांत झाली आहे.

loading image