Firozabad to Kolhapur : काकणाचा चुडा, सौभाग्याचं लेणं; बांगड्यांच्या व्यापाराला कोल्हापुरात मोठी मागणी

Bangles Fuel : फिरोजाबाद येथून दरमहा ट्रकभर काच बांगड्या कोल्हापूर जिल्ह्यात येत असून येथे बांगड्यांचा मोठा बाजार निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सुमारे ५०० हून अधिक दुकानांत बांगड्यांची खरेदी-विक्री होत आहे. सणासुदीच्या काळात या बांगड्यांची मागणी अधिक वाढते.
bangles wholesale supply

bangles wholesale supply

sakal

Updated on

कोल्हापूर : ‘‘बांगड्या भरीते एका रुपयाच्या नऊ-नऊमधी बापाजिचं नाव मागं पुढी उभे भाऊ, बाराजणी जावा तेरावी माझी सासू, चुडा भरताना येतं कासाराला हसू, फुटली बांगडी तर करू नको हळहळ, भाऊ माझा गं भाग्याचा देतो राजवर्खी ढाळ, अशा या जात्यावरील ओवीतून बांगड्यांच्या चुड्याचं महत्त्व आज ‘जेन झी’च्या युगातही अबाधित असून प्रत्येक स्त्री हे सौभाग्याचं लेणं हाती लेवत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com