
कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयात कोरोनामुळे ७५ वर्षीय वयोवृद्ध महिलेचा आज मृत्यू झाला. त्यांना कोरोनासोबत मधुमेह व हायपरटेंशनचा त्रास होता. गेले चार दिवस त्यांच्यावर सीपीआरच्या कोरोना कक्षात उपचार सुरू होते. नव्याने सुरू झालेल्या कोरोनाचा जिल्ह्यातील हा पहिलाच मृत्यू आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.