esakal | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदा पहिलीचा प्रवेश ऑफलाईन अन् ऑनलाईनही

बोलून बातमी शोधा

first entry this year is also offline and online Education marathi news

गुढीपाडव्याच्या निमित्ताने पहिली प्रवेशाची परंपरा बदलत्या काळात आजही कायम आहे. वाढत्या कोरोनामुळे यंदा शाळाच बंद आहेत.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यंदा पहिलीचा प्रवेश ऑफलाईन अन् ऑनलाईनही
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणारा पहिलाचा प्रवेश ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणार आहे. काही शाळांनी ऑनलाईन लिंक तयार करून प्रवेश अर्ज पाठवावेत, असे आवाहन केले आहे, तर काही शाळांनी प्रतिबंधात्मक नियमांसह ऑफलाईन प्रवेश प्रक्रियेवर भर दिला आहे. 

गुढीपाडव्याच्या निमित्ताने पहिली प्रवेशाची परंपरा बदलत्या काळात आजही कायम आहे. वाढत्या कोरोनामुळे यंदा शाळाच बंद आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने पहिली प्रवेश वाढवण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले जाते. मात्र, या शाळांना या मोहिमेचा विसर पडल्याचेच चित्र आहे. महापालिका शाळांनी मात्र ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही पर्याय पालकांसाठी खुले ठेवले आहेत. गेल्या वर्षीचा अनुभव पाहता पालकांना ऑनलाईन प्रवेशाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने बहुतांश शाळा ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबवणार आहेत. इतर शाळांतही हे दोन्ही पर्याय उपलब्ध केले आहेत. बालवाडी प्रवेशाबाबतही अशीच प्रक्रिया असेल. 

हेही वाचा- कपडे धुऊन नदीवर प्रदूषण कराल तर...

ऑनलाईन यशोगाथा..
पहिली प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक शाळांनी शाळांची यशोगाथा व्हिडिओज्‌च्या माध्यमातून तयार केली आहे. त्याशिवाय शाळेच्या वैशिष्ट्यांची माहितीपत्रके तयार करून ती सोशल मीडियावरून अधिकाधिक पालकांपर्यंत जातील, याची खबरदारी घेतली आहे.

संपादन-अर्चना बनगे