Kagal : गेले मासे पकडायला अन् सापडली मगर; पुढे काय घडले वाचा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kagal : गेले मासे पकडायला अन् सापडली मगर; पुढे काय घडले वाचा?

Kagal : गेले मासे पकडायला अन् सापडली मगर; पुढे काय घडले वाचा?

कागल : येथील दुधगंगा नदीपात्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरूणाला आज वेगळाच अनुभव आला. मासे पकडण्यासाठी नदीपात्रात टाकलेल्या गळाला चक्क सहा फुट लांबीची मगर लागली. त्यामुळे घाबरलेल्या त्याने गळासह दोराच सोडून दिला. या घटनेची आणि दुधगंगा नदीपात्रातील मगरीच्या वावर असल्याची चर्चा सर्वत्र जोरात सुरू आहे.

हेही वाचा: पंजाब, राजस्थानप्रमाणं राज्यात करा इंधन कर कपात; काँग्रेसची मागणी

दूधगंगा नदीला बारमाही पाणी असल्याने, नदीपात्रात मासे पकडण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच मासा खाण्याची तलफ आल्यानंतर नदीवर गळ घेऊन जाणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. असाच कागल शहरातील एक तरुण मनात माशाच्या पार्टीचा बेत आखत सकाळी सकाळी गळ घेऊन दुधगंगा नदीवर गेला. मासा पकडण्यासाठी गळाला माशाचे खाद्य लावून त्याने गळ नदीच्या पात्रात टाकला. दोन - तीन वेळा गळाला लावलेले खाद्य मासा खाऊन गेला. मात्र त्याच्या गळाला मासा काही लागला नाही. तरूणानेही हार न मानता पुन्हा गळाला खाद्य लावून नदीच्या पात्रात टाकला आणि तो गळाला मासा लागण्याची वाट पाहू लागला.

हेही वाचा: सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

गळाला लावलेले खाद्य मासा खात असल्याची जाणीव तरुणाला झाली. त्यामुळे त्याने गळ ओढण्यास सुरुवात केली. गळ बाहेर ओढल्यानंतर त्याने स्वप्नातही पाहिले नाही, अस दृश्य त्याच्या नजरेस पडले. गळाला माशा ऐवजी चक्क भली मोठी मगरच लागली होती. मासे पकडताना गळाला खेकडे आणि कासव लागल्याचे ऐकायला मिळते पण मगर गळाला लागणे दुर्मीळ. या घटनेची आणि दुधगंगा नदीतील मगरीच्या वावराची शहर आणि परिसरात चर्चा आहे. दोन दिवसापूर्वी याच परिसरात नदीकाठाला मेंढरे चारण्यासाठी गेलेल्या येथील विठ्ठल पाचगावे या मेंढपाळास या मगरीचे दर्शन झाले होते.

loading image
go to top