Kolhapur Crime: कबनूरमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारावर जीवघेणा हल्ला; प्रेमविवाह केल्याच्या रागातून वार, पाच जणांवर गुन्हा

वैभवचा मित्र त्याला त्वरित आयजीएम रुग्णालयात घेऊन गेला. याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर वैभवची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमी वैभवने दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या नातेवाईकांकडील पाच जणांवर खुनी हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
Kabnur: Police investigate spot where a known criminal was stabbed in a love-marriage-related dispute; five booked for attempted murder."
Kabnur: Police investigate spot where a known criminal was stabbed in a love-marriage-related dispute; five booked for attempted murder."Sakal
Updated on

इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथे प्रेमविवाह केल्याच्या रागातून लक्ष्मी मंदिराजवळ रेकॉर्डवरील गुन्हेगारावर हल्लेखोरांनी तलवारीने सपासप वार करून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात वैभव अनिल पुजारी (वय २३, रा. चंदूर) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com