esakal | गर्भलिंग तपासणी रॅकेटचा पर्दाफाश; पाच अटकेत,राणीचा शोध सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

 गर्भलिंग तपासणी रॅकेटचा पर्दाफाश; पाच अटकेत,राणीचा शोध सुरू

गर्भलिंग तपासणी रॅकेटचा पर्दाफाश; पाच अटकेत,राणीचा शोध सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: करवीर तालुक्यातील परिते (Parite) गावामधील बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी केंद्रावर रविवारी (ता. १८) पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी आज सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी गर्भलिंग चाचणी करणाऱ्या पोर्टेबल सोनोग्राफी मशिनसह रोख ३० हजार शंभर रुपये ताब्यात घेतले. अटक केलेल्या पाच जणांना न्यायालयाने गुरुवार (ता. २२) पर्यंत कोठडी दिली, अशी माहिती शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. Five Arrested In Gynecological Examination Case Kolhapur Crime News akb84

महेश सुबराव पाटील (वय ३०, रा. सिरसे, ता. राधानगरी), सचिन दत्तात्रय घाटगे (४२, रा. कसबा वाळवे), भारत सुकुमार जाधव (३६) अनिल भीमराव माळी (३६, दोघे रा. हुपरी, ता. हातकणंगले), साताप्पा कृष्णा खाडे (४२, रा. परिते, ता. राधानगरी), अशी अटक केलेल्यांनी नावे आहेत. राणी कांबळे (रा. कसबा वाळवे), राजमती यशवंत माळी (६३, रा. हुपरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: अकरावी प्रवेशासाठी ‘सीईटी’ द्या, हक्काने प्रवेश घ्या

चव्हाण म्हणाले, ‘‘परितेमध्ये गर्भलिंग तपासणी सुरू असल्याची माहिती कळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी पथकासह गावातील एका घरावर छापा टाकला. ते घर साताप्पा खाडे याचे आहे. तेथे हुपरीतील एका महिलेची गर्भलिंग तपासणी सुरू होती. त्या महिलेचा पती अनिल माळी, त्याची आत्या राजमती माळी होत्या. घरातील एका खोलीत सचिन, भारत, साताप्पा, राणी होते. पोलिस आल्याचे कळताच राणी कांबळे मागील दाराने पळून गेली. सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट झाले. या घरात काही दिवसांपासून महेश आणि राणी गर्भलिंग तपासणीचे काम करत होते. भरत जाधव व सचिन घाटगे एजंट असून गर्भवती महिलांशी संपर्काचे काम करत होते.’’यावेळी करवीर पोलिस उपाधीक्षक आर. आर. पाटील, पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर उपस्थित होते. कारवाई केलेल्या पथकामध्ये हेडकाँस्टेबल इरफान गडकरी, गौरव चौगुले, अमर आडुरकर यांचा समावेश होता.

राणीचा शोध सुरू

राणी कांबळेवर २०१७ मध्ये कागल पोलिस ठाण्यात गर्भलिंग तपासणीचा गुन्हा दाखल आहे. ती, पोलिस आल्यावर पळून गेली. पोलिस तिचा शोध घेत आहेत. पोलिसांनी कारवाईत तिची पर्स जप्त केली. त्यात रोख रक्कम, सिरींज, रक्त लागलेले कापसाचे बोळे, दोन प्रकारच्या फुटलेल्या ॲम्युल्स सापडल्या.

loading image