

कोल्हापूर जिल्ह्यातील पाच हजार परवानाधारक बंदुका जमा करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
esakal
Kolhapur Police Action : राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार, संवेदनशील मतदारसंघांची माहिती घेण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, मतदारांवर कोणताही दबाव येणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यात सात हजार शस्त्र परवानाधारक असून खेळाडू, सुरक्षारक्षकांची शस्त्रे वगळता इतर पाच हजार बंदुका जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.