
ओंकार धर्माधिकारी
काेल्हापूर जिल्ह्यातील महापुराला नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (महाराष्ट्र रेझिलन्स डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, एम.आर.डी.पी.) हा प्रकल्प बनवला आहे. यासाठी जागितक बँक अल्प व्याजदरात ३२०० कोटी रुपये देणार आहे. त्यातील कोल्हापूर महापालिका क्षेत्रामध्ये सुमारे ५२४ कोटी २१ लाख ४६ हजार खर्च होणार आहे. यासाठी शहराचा स्वतंत्र आराखडा बनवला आहे. मात्र, त्यामध्ये शहरातील पूरनियंत्रणाच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे. या प्रकल्पातील उपाययोजनांवर प्रकाशझोत टाकणारी मालिका.