
पंचगंगेची पातळी ४२ फूट दोन इंचांवर; दिवसभरात पाऊण फुटाने घट
कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग खुला
जिल्ह्यात २६९ कुटुंबांचे, २१२ जनावरांचे स्थलांतर
जिल्ह्यातील ७६ मार्ग बंद; ४७ बंधारे पाण्याखाली
पावसाची उघडझाप;कडकडीत ऊन
आलमट्टीतून अडीच लाख क्युसेक विसर्ग कायम
Kolhapur Flood News Today : शहर आणि परिसरातील पूर हळूहळू ओसरू लागला आहे, मात्र शिरोळमध्ये नृसिंहवाडी-कुरुंदवाड, नृसिंहवाडी, हेरवाड या गावांतील काही भागांत आणि इचलकरंजी नागरी वस्तीत पाणी घुसल्याने धोका कायम आहे. येथील नागरिकांसह जनावरांनाही स्थलांतरित करण्यात आले आहे.
आज दिवसभरात शिरोळ, हातकणंगले, कागल तालुक्यासह इचलकरंजी शहरातील २६९ कुटुंबांना व २१२ जनावरांना स्थलांतरित करण्यात आले. दरम्यान, केर्ले व आंबेवाडी येथील पाणी कमी झाल्याने कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीस खुला झाला. अद्याप जिल्ह्यातील ७६ मार्ग बंद असून, ४७ बंधारे पाण्याखाली आहेत. आज दिवसभरात पावसाची पूर्णपणे उघडीप राहून कडकडीत ऊन पडल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.