
Western Maharashtra Heavy Rain : कोल्हापूर जिल्ह्यासह कागल तालुक्यात आज पावसाने थोडी उसंत घेतल्याने वेदगंगा नदीची पाणीपातळी कमी झाली. त्यामुळे निपाणी- राधानगरी मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. मात्र, दूधगंगा नदीची पाणीपातळी वाढल्याने पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कागल येथे पाणी आले होते. तसेच सिद्धनेर्ली नदीकिनारा येथे नदी पुलावर अद्याप पाणी असल्याने कागल - निढोरी मार्गावरील वाहतूक आजही बंद करण्यात आली होती.