
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस
जनजीवन विस्कळीत संगमेश्वरातील ३० गावांशी संपर्क तुटलेला
अणुस्कुरा घाटात ५ तास वाहतूक ठप्प
चिपळुणात ५ तास पुराचे पाणी
राजापुरात १२ तास पुराचे पाणी
Konkan Rain News : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान सुरूच असून, वाशिष्ठी, जगबुडी, अर्जुना, कोदवली व काजळी नद्यांना पूर आला आहे. त्याचा फटका चिपळूण, राजापूर, खेड शहरांसह संगमेश्वर, चांदेराई बाजारपेठांना बसला. पुराचे पाणी बाजारपेठ परिसरात शिरल्यामुळे आज दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले होते. पुराच्या पाण्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग, तर अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने राजापूर-कोल्हापूर मार्ग दीर्घकाळ ठप्प झाला होता.