त्याचा ध्यास... नवी पिढी तंदुरुस्त बनविण्याचा....!

The focus is on making the new generation fit
The focus is on making the new generation fit

कोल्हापूर - छंदच व्यक्तीचे खरेखुरे सोबती ठरतात, हे आजच्या कोरोना महामारीच्या काळात सिद्ध झाल्याचे दिसते. काही जण कालांतराने या छंदाचे व्यवसायात रूपांतर करतात. याचाच प्रत्यय स्वर्णील विजय घुगरे याच्याकडे पाहिल्यावर येतो. स्वत: तंदुरुस्त बनून नव्या पिढीलाही तंदुरुस्त बनविण्याचा स्वर्णीलचा ध्यास आहे. 

वयाच्या १६-१७ व्या वर्षी स्वर्णीलला जिमची आवड निर्माण झाली. शरीरयष्टी कमावण्यासाठी तो व्यायाम करू लागला. इंटरनेटवरील विविध साइट्‌स तो पाहत असे. अंडी व चिकनचा आहार, रोज सहा तास झोप, सूर्यनमस्कार घालणे, पोहायला जाणे ही त्याची दिनचर्याच बनली. वजन वाढविण्यासाठी त्याने वेटलिफ्टिंगचा मार्ग निवडला. अरनॉल्ड व टायगर श्रॉफ हे त्याचे ‘आयडॉल’. एखाद्या कंपनीचा ‘ब्रॅंड अम्बॅसिडर’ बनण्याचे त्याचे स्वप्न आहे. स्वर्णीलचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण न्यू पॅलेस येथील छत्रपती शाहू विद्यालयात झाले.

गडमूडशिंगीतील न्यू पॉलिटेक्‍निकमध्ये त्याने इलेक्‍ट्रॉनिक डिप्लोमा पूर्ण केला. फुटबॉलपटू म्हणून त्याने आंतरशालेय स्पर्धा गाजवल्या. चौथी व पाचवीत असताना चित्रकलेची आवड निर्माण झाल्याने तो कोलाज रंगवू लागला. वडील विजय, आई सुवर्णा, काका अजय घुगरे यांचे त्याला मार्गदर्शन लाभते. हृदय कार्यक्षम राहण्यासाठी व शरीरात रक्तपुरवठा सुरळीत होण्यासाठी जलतरण, सायकलिंग आवश्‍यक आहे. यामुळे शरीराचा स्टॅमिना व प्रतिकारशक्ती वाढते. पुलअप्स, जोर-बैठका असा नियमित व्यायाम केला तरी पुरेसा आहे, असे स्वर्णील सांगतो.

संपादन - मतीन शेख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com