
Elephant Custody Karnataka : बेळगाव जिल्ह्यातील शेडबाळ येथील श्री शांतिसागर दिगंबर जैन आश्रम, श्री करीसिद्धेश्वर मठ अलकनूर (ता. रायबाग), गुरू महंतेश्वरस्वामी मंदिर बिचले (जिल्हा रायचूर) यांच्याकडे असलेल्या हत्तीबाबत त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तेथील तीन हत्तींचे हाल होत असल्याचे कर्नाटक वनविभागाचे मत आहे. याप्रकरणी पर्यावरण कार्यकर्ते जी. आर. गोविंद यांनी जून २०२५ मध्ये न्यायालयात जनहित याचिका दाखल करत तातडीने या हत्तींच्या सुटकेची मागणी केली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने प्रतिवादींना चार ऑगस्ट २०२५ पर्यंत हजर राहण्याचे किंवा उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.