esakal | खवय्येगिरीला आधार पार्सल सेवेचा
sakal

बोलून बातमी शोधा

Foodie Depends On Parcel Service Kolhapur Marathi News

कोरोनामुळे गेली दोन महिने हॉटेल, खानावळी बंद आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून मागणी लक्षात घेऊन हॉटेल व्यावसायिकांनी पार्सल (टेक अवे) पद्धत सुरू केली आहे. परिणामी, खवय्यांना याचा मोठा आधार मिळाला आहे. केवळ मोठ्या शहरात आढळणाऱ्या टेक अवेला आता स्थानिक ग्राहकांचा प्रतिसाद वाढतो आहे. 

खवय्येगिरीला आधार पार्सल सेवेचा

sakal_logo
By
दीपक कुपन्नावर

गडहिंग्लज : कोरोनामुळे गेली दोन महिने हॉटेल, खानावळी बंद आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून मागणी लक्षात घेऊन हॉटेल व्यावसायिकांनी पार्सल (टेक अवे) पद्धत सुरू केली आहे. परिणामी, खवय्यांना याचा मोठा आधार मिळाला आहे. केवळ मोठ्या शहरात आढळणाऱ्या टेक अवेला आता स्थानिक ग्राहकांचा प्रतिसाद वाढतो आहे. 

गडहिंग्लज शहर परिसरात दीडशेहून अधिक हॉटेल, तर दोनशेहून अधिक नाश्‍त्यासाठी टपरी आहेत. वाजवी दरात दर्जेदार खाद्यपदार्थ मिळणारे केंद्र म्हणूनही गडहिंग्लजचा सीमाभागात नावलौकिक आहे. त्यामुळेच छोटे शहर असूनही हॉटेल्स आणि खानावळ यांची संख्या तुलनेत अधिक आहे. कोल्हापूर, कर्नाटकातून गोवा आणि कोकणला जाणारे प्रवासी चांगल्या दर्जामुळे जाणीवपूर्वक नाश्‍ता आणि जेवणासाठी या ठिकाणी थांबतात. 

चौथ्या लॉकडाउनमध्ये हॉटेलला परवानगी न मिळाल्याने उर्वरित अनेक हॉटेल व्यावसायिकांनी टेक अवेला पसंती देत खवय्यांचे चोचले पुरवण्यासाठी पार्सल पद्धत अंगीकारली. 
प्रारंभी मांसाहारी हॉटेलने यात आघाडी घेतली. चिकन मटण आणि बिर्याणीची किलोसह, डिश आणि ताट सिस्टीम सुरू केली. पाठोपाठ शाकाहारी पार्सल सुरू झाले. कांदा भजी, बटाटे भजी भजी, बटाटे भजी, पाव भजी, मिसळ, पापडी यांना ही मागणी वाढली आहे. व्यावसायिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पार्सल सेवेची जाहिरात करून ग्राहकांना आकर्षित करत आहेत. 

पूर्वीच्या तुलनेत 60 टक्के व्यवसाय
सायंकाळच्या सत्रात भजीला ग्राहकांचा अधिक प्रतिसाद आहे. पूर्वीच्या तुलनेत पार्सल सेवा असूनही 60 टक्के व्यवसाय होतो आहे. 
- सुभाष पाटील, भजी विक्रेता, गडहिंग्लज. 

टेक अवेला पसंती
चिकनपेक्षा मटणाला अधिक मागणी आहे. कोरानाच्या भीतीमुळे कुटुंबातूनही टेक अवेला पसंती दिली जात आहे. दुपारपर्यंत ऑर्डर घेऊन सायंकाळी पार्सल दिले जाते. 
- संदीप कोतेकर, अभिषेक चव्हाण, हॉटेल व्यावसायिक, गडहिंग्लज 

loading image