
चंदगड : वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने फासके लावणारेच वन विभागाच्या जाळ्यात अडकले. आज सकाळी माडवळे पैकी (ता. चंदगड) ढेकोळी जंगलात पाटणे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत संशयित ईश्वर मारुती नाईक (वय २६), गुंडू मारुती तरवाळ (३५, दोघेही रा. कुद्रेमणी, ता. जि. बेळगाव) यांनी शिकारीच्या उद्देशाने लावलेले फासके काढत असताना आढळले.