१९९७, २००२ व २००७ असे सलग तीन वेळा जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून येत नाना गाट यांनी हॅटट्रिक साधली होती.
esakal
कोल्हापूर
Former ZP President Nana Gat : हुपरी शहराला पाणीदार करणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नाना गाट यांचे निधन
Former ZP President : १९९७, २००२ व २००७ असे सलग तीन वेळा जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून येत नाना गाट यांनी हॅटट्रिक साधली होती. याच काळात जिल्हा परिषदेचे त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं.
Hupari Kolhapur Politics : (बाळासाहेब कांबळे) हुपरी येथील जेष्ठ नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब फक्कड गाट (वय ८०) यांचे आज शनिवारी पहाटे निधन झाले. ते गेले काही दिवस आजारी होते. त्यांच्या निधनाने शहरात शोककळा पसरली आहे. शहर तसेच परिसराच्या सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रातील एक जुने जाणते नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

