माजी आमदार म्हणतात, 'विना अट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहे'

Former MLA Rajiv Awale clarification on ncp entry
Former MLA Rajiv Awale clarification on ncp entry
Updated on: 

इचलकरंजी - उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांच्या उपस्थीतीत मुंबईत लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करीत आहे. त्यानंतर पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. आपल्या या निर्णयाबाबत हातकणंगले विधान सभा मतदार संघातील सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी प्रतिक्रीया माजी आमदार राजीव आवळे यांनी आज व्यक्त केली.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी आमदार असलेले आवळे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियातून रंगली होती. या पार्श्‍वभूमीवर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना प्रवेशाबाबतची भूमिका अधिकृतपणे जाहीर केली. यावेळी त्यांचे बंधू नगरसेवक अब्राहम आवळे उपस्थीत होते.

श्री.आवळे म्हणाले, विना अट आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत आहे. या निमित्ताने व्यापक काम करण्याची संधी मिळणार आहे. यापुढे पक्ष वाढीसाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. हातकणंगले विधान सभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या विचारांची अनेक माणसे आहेत. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र आणून पक्षाची मजबूत बांधणी केली जाणार आहे. 

आपण जनसुराज्य शक्ती पक्षाचे निष्ठेने काम केले. पण गेल्या विधान सभेवेळी आपणास उमेदवारी मिळाली नाही. आपल्यावर अन्याय करण्यात आला. महामंडळावर संधी देतांनाही आपल्या मतदार संघातील कार्यकर्त्यांवर जनसुराज्य पक्षाच्या नेतृत्वाकडून अन्याय झाला. त्यामुळे या पक्षात राहून चीज होणार नाही, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्टीकरण आवळे यांनी यावेळी दिले.

माजी नगराध्यक्षांचा होणार प्रवेश
आजी आमदार आवळे यांच्यासह पेठवडगावच्या माजी नगराध्यक्षा लता सुर्यवंशी यांचाही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांचा एक व्यापक मेळावा घेणार असून प्रांतिक उपाध्यक्षा प्रविता सालपे व सदस्य मदन कारंडे यांचे सहकार्य मिळत असल्याचे श्री.आवळे यांनी यावेळी सांगितले.

 
इचलकरंजीतील राष्ट्रवादी एकत्रीत करणार

इचलकरंजीत राष्ट्रवादीमध्ये कारंडे व जांभळे अशा दोन भरभक्कम गटात राष्ट्रवादी कॉंग्रेस विभागली आहे. या संदर्भात विचारल्यानंतर आवळे यांनी या दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले.

संपादन - धनाजी सुर्वे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Madhuri the elephant, whose rehabilitation at Vantara is being sought again by PETA India through the Supreme Court
Gokul Milk Union Election Mahayuti Seat-Sharing Formula
Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Marathi News Esakal
www.esakal.com